विंचूरला रयत क्र ांती संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 06:01 PM2020-09-17T18:01:16+5:302020-09-17T18:03:35+5:30
विंचूर : शासनाने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधात रयत क्र ांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील नाशिक-औरंगाबाद महार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी कांदा हा खरंच जीवनाश्यक आहे का? आज कोरोनाच्या काळात कांदा खाल्याने जीव वाचतो का तर नाही. या देशातील जनतेला कोरोनापासून वाचवायचे असेल तर कांदा विकत न घेता,औषधोपचार विकत घ्यावा. या देशातील शेतकरी ऊस पिकवणारा, कडधान्य पिकवणारा असे सर्व शेतमाल पिकवणारा आहे.पण त्याच्या शेतमालास भाव मिळाला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून तुम्हाला पायदळी तुडवेल असा इशारा त्यानी केंद्र सरकारला दिला. यानंतर तहसीलदार दीपक पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष शिवनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे, दीपक पगार, अॅड. अशिष शेलार, रमेश पालवे, नितीन जाधव, सोमनाथ काकडे, निवृत्ती कुवर, जयंत लोहारकर, अनिल बोचरे, जयंत लोहारकर, शंकर गोरे, अॅड. ज्योती निरगुडे, संदीप मांदळे, शंकर दरेकर, आशा गायकवाड, वर्षा तास्कर, वैशाली पोटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.