रस्त्यात भात लावणी करून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:28 PM2018-08-25T17:28:21+5:302018-08-25T17:29:13+5:30
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावला जोडणाऱ्या समनेरे, मालुंजे, मोगरे, आशाकिरण वाडी या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांत भात लावणी करून अभिनव आंदोलन केले.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावला जोडणाऱ्या समनेरे, मालुंजे, मोगरे, आशाकिरण वाडी या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांत भात लावणी करून अभिनव आंदोलन केले. दहा ते पंधरा गावांना जोडणाºया मुंढेगावपासून ते शेवटच्या टोकापर्यंत या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकवेळा छोटे-मोठे अपघातदेखील घडत आहेत. अनेकांचा अपघातात बळी गेला आहे, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सतत माहिती देऊन व तक्रार करूनसुध्दा अधिकाºयांकडून दुर्लक्ष गेले जात आहे
इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, प्रताप जाखेरे, गणेश उगले यांच्या नेतृत्वाखाली मुंढेगाव ते वाघेरे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपांची लावणी करून गांधीगिरी करण्यात आली. अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविण्यात आला. शासनाने लवकरात लवकर या भागातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूळचंद भगत, उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, मनविसे तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष गणेश उगले आदींनी दिला आहे.
आंदोलनात महिलांसह तरु ण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी मुंढेगावचे सरपंच गणेश दळवी, युवा नेते रवि गतीर, उपतालुकाध्यक्ष जनार्दन गतीर, मुंढेगावचे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गतीर, कानिफनाथ गतीर, मनविसे उपतालुका अध्यक्ष पिंटू चव्हाण, भास्कर जाखेरे, नामदेव जाखेरे, गोविंद जाखेरे, गोपाळ आदी उपस्थित होते.