कृउबात दुसºया दिवशीही आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:24 PM2020-01-03T22:24:28+5:302020-01-03T22:24:52+5:30
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भूखंडावर गुदाम व गाळे उभारू नयेत या मागणीसाठी गुरुवारपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारून धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी सलग दुसºया दिवशी बाजार पेठेतील उलाढाल ठप्प होती. बाजार समितीचे संचालक प्रसाद हिरे, वसंत कोर, शेख फकीरा मोहंमद शेख साबीर यांनी आंदोलकांशी चर्चा करून मध्यस्थी केली. सचिव अशोक देसले यांच्याशी बाजार समिती लिलाव पूर्ववत कसे करता येतील याबाबत सूचना केल्या.
मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भूखंडावर गुदाम व गाळे उभारू नयेत या मागणीसाठी गुरुवारपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारून धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी सलग दुसºया दिवशी बाजार पेठेतील उलाढाल ठप्प होती. बाजार समितीचे संचालक प्रसाद हिरे, वसंत कोर, शेख फकीरा मोहंमद शेख साबीर यांनी आंदोलकांशी चर्चा करून मध्यस्थी केली. सचिव अशोक देसले यांच्याशी बाजार समिती लिलाव पूर्ववत कसे करता येतील याबाबत सूचना केल्या.
बाजार समितीच्या मोकळ्या भूखंडावर एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गुदाम उभारले जाणार आहे. याला व्यापाºयांनी विरोध दर्शविला आहे. गुरुवारी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव व संचालक मंडळ बाजार समितीत फिरकले नसल्याने शुक्रवारी दुसºया दिवशीही व्यापाºयांनी आंदोलन सुरू ठेवले होते. शुक्रवारी संचालक प्रसाद हिरे, वसंत कोर, शेख फकीरा यांनी आंदोलक व्यापाºयांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. व्यापाºयांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. प्रसाद हिरेंसह दोघा संचालकांनी सचिव अशोक देसले यांची भेट घेऊन शेतकºयांचा माल पडून आहे, लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने तोडगा काढावा, अशा सूचना केल्या. तसेच उपसभापती सुनील देवरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. बाजार समितीतील लिलाव बंद असल्यामुळे सलग दुसºया दिवशी दैनंदिन ९० लाखांची उलाढाल ठप्प झाली होती. शुक्रवार आठवडे बाजार असल्याने जनावरांचा बाजार सुरू होता.