सिन्नर शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:01 PM2020-03-23T18:01:04+5:302020-03-23T18:01:50+5:30

सिन्नर : शहरातील मध्यवस्तीत भरणारा भाजीबाजार शहराबाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचाली नगरपालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नगरपरिषद पदाधिकारी आणि प्रशासन कामाला लागले आहे.

Movement of shifting vegetable market in Sinnar city | सिन्नर शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचाली

सिन्नर शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचाली

googlenewsNext

शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सिन्नर शहर व तालुक्यात रविवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला. सोमवारी केवळ अत्यावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरू होती. किराणा दुकान, दूध, भाजीपाला, औषधालय व रुग्णालय सुरू होते. बससेवा बंद असल्याने बस स्थानकावर शुकशुकाट होता.नाशिक-पुणे महामार्गावर खासगी वाहनांची गर्दी दिसून येत होती. तर शिर्डी महामार्गावर वाहतूक रोडावल्याचे चित्र होते. पुण्याहून नाशिकच्या दिशेने मोठ्या संख्येने वाहने येताना दिसून येत होती. शहरात किराणा दुकान, गिरण्या, भाजीपाला घेणे यासाठी थोड्या-फार प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आली. प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात होते. शहरात औषध फवारणी व धुराणी करण्याचे काम नगरपालिका प्रशासनाकडून सुरु होते. शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. सकाळी शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात होती तर सायंकाळी धुराणी केली जात आहे. नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी वारंवार ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले जात होते. शहरात रिक्षा फिरवून नागरिकांची जनजागृती केली जात आहे.

Web Title: Movement of shifting vegetable market in Sinnar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार