सातपूरला सीटू कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:00 AM2018-11-28T01:00:37+5:302018-11-28T01:00:52+5:30
कारखाना व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी नॅश रोबोटिक्स या कारखान्यासमोर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.
सातपूर: कारखाना व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी नॅश रोबोटिक्स या कारखान्यासमोर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत नॅश ग्रुप अंतर्गत काही कायम कामगारांनी सिटूचे नेतृत्व स्वीकारले आहे. कामगारांनी युनियनचे नेतृत्व स्वीकारल्याने कामगारांना कामावरून कमी करणे, कामगारांच्या पसंतीच्या युनियनशी बोलणी न करणे या कारणांसाठी सीटू जनवादी महिला संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सीटूचे जिल्हा अध्यक्ष सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, जनवादी महिला संघटनेच्या सरचिटणीस शिंदू शार्दुल, कल्पना शिंदे, मंगल पाटील, संगीता भवर, खंडेराव झाडे आदि उपस्थित होते.