गोशाळा वाचविण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:05 AM2018-08-11T01:05:18+5:302018-08-11T01:05:38+5:30
नाशिक : एखाद्या विषयावर सोशल मीडियावर चळवळ सुरू करणे ही बाब नवीन नाही. मात्र नाशिक महापालिकेने एका गोशाळेस हटविण्यासाठी दिलेल्या नोटिसींच्या आधारे मोरवाडी परिसरातील मंगलरूप ट्रस्टची छोटी गोळा वाचविण्यासाठी व्हॉटस अॅपसह अन्य सोशल मीडियावरएक चळवळ सुरू झाली असून त्यामुळे प्रशासन काहीसे वरमले आहेत.
नाशिक : एखाद्या विषयावर सोशल मीडियावर चळवळ सुरू करणे ही बाब नवीन नाही. मात्र नाशिक महापालिकेने एका गोशाळेस हटविण्यासाठी दिलेल्या नोटिसींच्या आधारे मोरवाडी परिसरातील मंगलरूप ट्रस्टची छोटी गोळा वाचविण्यासाठी व्हॉटस अॅपसह अन्य सोशल मीडियावरएक चळवळ सुरू झाली असून त्यामुळे प्रशासन काहीसे वरमले आहेत.
खरे तर ही गोशाळाही नव्हे तर एक प्रकारचे गायी गुरांचे तात्पुरते उपचार केंद्रच आहे. शहरात किंवा जिल्ह्यात कोठेही एखादी गाय आजारी किंवा अपघातामुळे जखमी झाली असली तरी नागरिक या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना दूरध्वनी करतात आणि संबंधित गोसेवक तातडीने घटनास्थळावरून त्या गायीला किंवा बैलाला अथवा वासराला सिडको विभागातील मोरवाडी येथील गोशाळेत आणतात. तेथे पशुवैद्यांद्वारे उपचार करतात आणि त्यानंतर त्या गायीचा मालक आला तर सुपूर्द केली जाते अथवा त्याचे संगोपन करून नंतर आदिवासी भागातील कोणी निर्धन असेल तर त्याला नियमानुसार गाय किंवा बैल दिला जातो. त्यासाठी त्याच्याकडून कायद्याच्या चौकटीनुसार हमी बॉँड घेतला जातो.
मोरवाडी हे गाव आता
शहरात असले तरी त्यातील अवघ्या दोनशे वारावरील या गोशाळेत हे कार्य चालते. परंतु परिसरातील नागरिकाने तक्रार केल्याचे
निमित्त करून आधी महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना आधी
गोठा हटवा म्हणून नोटीस बजावली. गोठा आणि गोशाळा हा फरक महापालिकेने केला नाहीच आता तर तेथून जागा रिकामी करा अशाच प्रकारची नोटीस बजावण्यात
आली.
याप्रकारानंतर नाशिकमधील सर्व गोप्रेमी एकत्र आले असून त्यांनी व्हॉटस अॅप, फेसबुक ग्रुप
तयार केला आहे. त्या माध्यमातून राज्यभरातील पशु पक्षिप्रेमी
एकत्र आले असून, त्यांनी चळवळीला पाठींबा देण्यापासून कायदेशीर सल्लामसलत
केल्याने आता उभारण्यात आली आहे. ही गोशाळा तेथून हटवूच नये यासाठी प्रयत्न केले जाणार
आहेत.