भुजबळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 10:40 PM2016-02-02T22:40:14+5:302016-02-02T22:41:05+5:30

रास्ता रोको : कळवण, चांदवड, सटाणा, नांदगाव येथे निषेध मोर्चे

Movement in support of Bhujbal | भुजबळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन

भुजबळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन

googlenewsNext

कळवण : माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्त वसुली संचालनालयने सोमवारी अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस, महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने मंगळवारी दुपारी १ वाजता कळवण बसस्थानकाजवळ रस्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे कळवण- नाशिक व कळवण-देवळा रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी सांगितले की, राज्य सरकार राजकारण करून सूडबुद्धीने भुजबळ परिवारावर कारवाई करत असून, सक्त वसुली संचालनालय, एटीएस सारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, राष्ट्रवादीचे कळवण विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या कारवाईबाबत शासनावर टीका केली.
आंदोलनात साकाचे माजी संचालक कृष्णा बच्छाव, जितेंद्र पगार, अमोल पगार, विलास रौंदळ, संजय पगार, जयेश पगार, सागर खैरनार, रामा पाटील, भूषण बच्छाव, कौतिक गांगुर्डे, कैलास बच्छाव, दीपक वाघ, दीपक जाधव, सतीश गांगुर्डे, चेतन शिंदे, अमित देवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चांदवड : येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुंबई-आग्रारोडवर अर्धातास रास्ता रोको करण्यात येऊन तहसीलदार माणिक अहेर यांना निवेदन देण्यात आले. माजी खासदार समीर भुजबळ यांना राजकीय सूडापोटी अटक केली आहे. त्यांचा महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी कोणत्याही
प्रकारचा संबंध नसतानाही छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना विनाकारण यात गोवले जात असल्याचा आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉँग्रेस चांदवड तालुका यांनी केला आहे. भाजपा व त्यांचा मित्रपक्ष सरकारचा जाहीर निषेध केला. सदर आरोप सरकारने तत्काळ मागे घेण्यात यावे व भुजबळ परिवाराला निर्दोष मुक्त करावे अन्यथा चांदवड तालुका अखिल भारतीय समता परिषदेतर्फे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब
कर्डक, बाळासाहेब माळी, तालुकाध्यक्ष उत्तम अहेर, डॉ. ए. पी. निकम, विनोद माळी, तुकाराम सोनवणे, राजाभाऊ शेलार, नवनाथ अहेर, नंदू मंडलिक, कैलास खैरे, किशोर शेलार, शांताराम गांगुर्डे, देवीदास शेलार, किशोर सोनवणे, दीपक खैरे, सुनील क्षीरसागर, पंडित माळी, सागर अहेर, अंबादास सोनवणे, धोंडीराम खैरे, विठ्ठल पगार, अशोक सोनवणे आदिंसह समता परिषद व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होेते.
नांदगाव : येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. आमदार पंकज भुजबळ यांचे संपर्क कार्यालय असलेल्या मालेगाव रस्त्यावरील व्ही. टी. संकुलच्या बाहेर हे आंदोलन केले. आंदोलनामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी चाळीसहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेऊन त्यांची मुक्तता केली. साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, नगराध्यक्ष शैलेजा गायकवाड, नगरसेवक शिवाजीराव पाटील, इंदिरा बनकर, विश्वास आहिरे, इकबाल शेख, विजय पाटील, राजेंद्र
लाठे, माजी नगरसेवक राजेंद्र गायकवाड, महेंद्र गायकवाड, सुरेश गायकवाड, नारायण पवार, उपसरपंच अतुल पाटिल, मधुकर बोरसे,
देवदत्त सोनवणे आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Movement in support of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.