मालेगावी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 02:35 PM2021-02-06T14:35:54+5:302021-02-06T14:36:50+5:30
मालेगाव:- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्यात बदल करावा तसेच सक्तीची विज बिल व जिल्हा बँकेची कर्ज वसुली थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टेहरे-सोयगाव चौफुलीवर चक्का जाम आंदोलन केले.
मालेगाव:- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्यात बदल करावा तसेच सक्तीची विज बिल व जिल्हा बँकेची कर्ज वसुली थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टेहरे-सोयगाव चौफुलीवर चक्का जाम आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार विकास पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील टेहरे सोयगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत ,जिल्हा बँक व वीज वितरण कंपनीने सक्तीची वसुली थांबवावी ,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. नायब तहसीलदार पवार व छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, राजू शिरसाठ, सुखदेव वाघचौरे, महेंद्र बोरसे ,संदीप शेवाळे ,दादा शेवाळे आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.