आदिवासी विकास कर्मचाºयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:51 AM2018-01-23T00:51:13+5:302018-01-23T00:52:01+5:30
आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी आदिवासी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांबाबत विचार न केल्यास फेब्रुवारीपासून तीव्र्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी आदिवासी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांबाबत विचार न केल्यास फेब्रुवारीपासून तीव्र्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. संघटनेने डिसेंबरमध्येदेखील मागण्यांबाबत आदिवासी विकास आयुक्तांशी चर्चा केली होती व त्यावेळी त्यांनी एक महिन्याच्या आत कार्यवाही करून ज्या मागण्या शासन स्तरावरील आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तथापि, या महिन्याभरात काहीच कार्यवाही झाली नाही. शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ बदलण्यात यावी, ही मागणी सर्व आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी जास्तीचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोमवारी सकाळी १० वाजेपासूनच संघटनेच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन सुरू करून दुपारी प्रवेशद्वारावर जोरदार घोेषणाबाजी केली. शासनाने लवकरात लवकर संघटनेशी बोलणी करून प्रश्न सोडावेत अन्यथा फेब्रुवारीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात भालचंद्र बोºहाडे, सुभाष बावा, पी. बी. जाधव, संजय जाधव, हिरालाल बावा, विजय खैरनार, बी. एन. देवरे, एन. डी. भामरे, ज्ञानेश्वर राव, गोकूळ राव, आर. के. चौधरी, बी. एच. कापडणीस यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
कर्मचारी संघटनेच्या अशा आहेत मागण्या
पदोन्नतीची संधी उपलब्ध नसणाºया वा एकाकी पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना देण्यात यावा.
उपलेखापाल हे पद शंभर टक्के पदोन्नतीने भरण्याबाबत २० जानेवारी २०१० च्या सेवाभरती करण्यात यावी. तसेच अन्य संवर्गाचे सेवाभरती नियमात सुधारणा करण्यात यावी.
आदिवासी विकास विभागातील आदिवासी उपयोजना व उपयोजनाबाह्य क्षेत्रातील कार्यरत कर्मचाºयांना भाडेमाफ निवासस्थान उपलब्ध करून द्यावे.
आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेकरिता प्रत्येक विषयासाठी ७ पदांऐवजी ८ पदांची निर्मिती करण्यात यावी.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची पदोन्नतीने पदे त्वरित भरण्यात यावीत.