वसाका कामगारांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:09 AM2019-01-24T01:09:48+5:302019-01-24T01:10:14+5:30
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ चे थकीत देणे मिळावे व कामगार आयुक्तांसमोर भाडेकरू संस्था व कामगार यांच्यात करार व्हावा यासाठी वसाका कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरू होते.
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ चे थकीत देणे मिळावे व कामगार आयुक्तांसमोर भाडेकरू संस्था व कामगार यांच्यात करार व्हावा यासाठी वसाका कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरू होते.
दरम्यान वसाका कारखान्याचे अवसायक राजेंद्र देशमुख यांनी कारखाना कार्यसथळावर येवून कामगार व भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याचे संचालक मंडळाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. याबाबतआज कामगार संघटना व व्यवस्थापकीय मंडळ यांच्यात चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता झालेल्या चर्चेतुन निसपन्न झाले. दरम्यान अवसायक राजेंद्र देशमुख यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की कामगारांनी कारखाना बंद करण्याची घाई करण्याची गरज नव्हती कामगार व शेतकºयाच्या प्रश्नांची आपणास जान आहे. उद्या यासंदर्भात सामजस्यशयाने तोडगा काढण्यात येईल. असे सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडीतराव निकम, वसाका बचाव कृती समितीचे सुनील देवरे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हअध्यक्ष गोविंद पगार, प्रहरचे कृष्णा जाधव, माणीक निकम, आदींनी कामगारांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला.
यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, विलास सोनवणे, कुबेर जाधव, आदींनी कामगाराच्या वतीने आपली भूमिका मांडली. यावेळीबहुसंख्य कामगारांसह महिलाही उपस्थित होत्या.