काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:33+5:302021-06-29T04:11:33+5:30

नाशिक शहराचे पूर्णवेळ अध्यक्षपद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असून, त्याचा पदभार प्रभारी म्हणून शरद आहेर यांच्याकडे सोपविण्यात आला ...

Movements to change Congress District President, City President | काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

Next

नाशिक शहराचे पूर्णवेळ अध्यक्षपद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असून, त्याचा पदभार प्रभारी म्हणून शरद आहेर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आहेर यांच्यावर राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीदेखील असल्यामुळे शहरात पक्ष संघटन वाढीसाठी त्यांचा कितपत उपयोग होईल याचा विचार करूनच पक्षाने हा फेरबदल करण्याचे ठरविल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे यांच्यावर दोन वर्षांपूर्वी पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली परंतु ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमाणात पक्ष अजूनही उभारी घेउ शकलेला नाही. त्यामुळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, फ्रंटल प्रमुख व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या भावना जाणूनच यापुढे पक्ष संघटनेची धुरा सोपविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

चौकट=====

अनेक नावांची चर्चा

शहराध्यक्षपदासाठी डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, शोभा बच्छाव, आकाश छाजेड या नेहमीच्या नावांच्या चर्चेबरोबरच राहुल दिवे, सुरेश मारू, वसंत ठाकूर, उद्धव पवार, राजेंद्र बागुल या नवीन चेहऱ्यांनीही अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. तर जिल्हाध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर गायकवाड, भरत टोकेकर, रमेश कहांडोळ यांच्या नावाची चर्चा होत आहे.

Web Title: Movements to change Congress District President, City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.