शहर बससाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:23 AM2017-10-11T01:23:52+5:302017-10-11T01:24:05+5:30
शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे, अशी अनुकूल भूमिका आयुक्तांनी घेतल्याने बससेवा ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
नाशिक : शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे, अशी अनुकूल भूमिका आयुक्तांनी घेतल्याने बससेवा ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळामार्फत शहर बससेवा चालविली जात आहे. परंतु, शहर बससेवा तोट्यात जात असल्याने महामंडळाने आजवर वारंवार बससेवा बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत अनेक मार्गांवरील बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या एप्रिलनंतर बससेवा पूर्णपणे बंद करण्याचा अल्टिमेटमही महामंडळाने दिला आहे. या साºया पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी त्यासंदर्भात एजन्सीसमवेत तांत्रिक बोली प्रक्रिया राबविली जाणार आहे. सदर सल्लागाराला तीन महिन्यांचा अवधी दिला जाणार असून, त्याच्याकडून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. आयुक्तांनी सांगितले, सध्या महापालिकेमार्फत बसथांबे उभारले जातात आणि त्याचा वापर परिवहन महामंडळाकडून केला जातो. अशा बºयाच गोष्टी आहेत. त्यामुळे बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे. परंतु, बससेवा चालविणे तितके सोपेही नाही. त्याला अनेक तांत्रिक कंगोरे आहेत. सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.