शिक्षण समितीच्या फेररचना करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:53 IST2019-11-09T23:09:56+5:302019-11-10T00:53:30+5:30
महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यांची मुदत नोव्हेंबरअखेर संपणार असून, त्यामुळे नूतन सदस्य निवडीसाठी नगरसचिव विभागाने महापौरांना पत्र दिले आहे.

शिक्षण समितीच्या फेररचना करण्याच्या हालचाली
नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यांची मुदत नोव्हेंबरअखेर संपणार असून, त्यामुळे नूतन सदस्य निवडीसाठी नगरसचिव विभागाने महापौरांना पत्र दिले आहे. समितीत एकूण नऊ सदस्य असून, सध्या भाजपच्या प्रा. सरिता सोनवणे या सभापती असून, याच पक्षाच्या प्रतिभा पवार उपसभापती आहेत. त्यांची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपणार असून, त्या पार्श्वभूमीवर नूतन सदस्य निवडण्याची कार्यवाही करण्यासाठी नगरसचिव विभागाने पत्र दिले आहेत. येत्या मासिक सभेतच नूतन सदस्य निवडले जाण्याची शक्यता आहे.