त्र्यंबकेश्वर मेटघर किल्याचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरु !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 02:45 PM2020-08-13T14:45:09+5:302020-08-13T14:45:30+5:30
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.
यावेळी ब्रम्हगिरी परिसरातील जवळपास सहा वाड्या-पाडे मिळुन स्थापन करण्यात आलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन आमदार खासकरांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटन विकास विभागांतर्गत असलेला निधी सुमारे पाच कोटी रु पये उपलब्ध झाले असून हा निधी वितरीत करण्यापुर्वी अत्यावश्यक कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
या प्रसंगी अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांच्या समवेत विस्तृत चर्चा करण्यात आली. सध्या म्हाळसादेवी मंदिर जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. येथे सभामंडप व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळेस गंगाद्वारच्या नुतनीकरणाविषयी आर्किटेक्चुअल प्रेझेटेशन करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नगरसेवक सागर उजे, संपत बदादे, काळु भांगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र .२ चे उपविभागीय अभियंता पांडुरंग सोनवणे, वास्तु विशारद ऋतुुजा लोहगावकर, बांधकाम व्यावसायिक प्रविण शिरसाट आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे पावसाळ्यात अतिवृष्टीने दरड कोसळणे, मोठमोठे दगड निसटणे तसेच उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटणे तथा नष्ट होणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात. कारण शेतीवर, पायऱ्यांवर सिझनेबल व्यवसाय करु न शेतीला पुरक व्यवसाय केल्याने त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत असतो. यासाठी वरच पाण्याची सुविधा मेटघरचा पर्यटन विकास खात्यामार्कत कायापालट झाल्यास स्थलांतरही होणार नाही. व्यवसाय शेतीही करता येवू शकेल.
(फोटो १३ त्र्यंबक,०१)
पाहणी करतांना आमदार हिरामण खोसकर. सोबत वनविभागाचे अधिकारी अटल पंचायती अखाड्याचे महंत उदयगिरी महाराज मेटघेरा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी.