मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:21 AM2018-08-25T02:21:40+5:302018-08-25T02:21:59+5:30
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील असंतोषाला अखेर नगरसेवकांनी अविश्वास ठरावाद्वारे वाट फोडल्याचे वृत्त असून, नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही अशाच प्रकारे तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी आयुक्तांच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेत पन्नासहून अधिक नगरसेवकांच्या सह्या झाल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत महासभेची तारीख निश्चित होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील असंतोषाला अखेर नगरसेवकांनी अविश्वास ठरावाद्वारे वाट फोडल्याचे वृत्त असून, नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही अशाच प्रकारे तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी आयुक्तांच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेत पन्नासहून अधिक नगरसेवकांच्या सह्या झाल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत महासभेची तारीख निश्चित होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत
आहे.
९ फेब्रुवारी रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या तुकाराम मुंढे यांचे नगरसेवकांशी जमल्याचे दिसत नव्हते. मुंढे यांनी अंदाजपत्रकात लक्षणीय बदल केल्यानंतर कामकाजाची पद्धतही महापालिकेतील पारंपरिकतेला फाटा देणारी ठरली. नगरसेवकांनी ठरविलेली २५७ कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आल्याने वातावरण बदलू लागले. त्यानुसार सायंकाळी बैठक झाली.