कंधाणे गटातून उमेदवारीसाठी हालचाली गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:25 AM2018-04-25T00:25:26+5:302018-04-25T00:25:26+5:30
बागलाण तालुक्याच्या बळीराजाची आर्थिकवाहिनी समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने ऐन लग्नसराईच्या धामधुमीत तालूुयातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. एका बाजूला उष्णतेचा वाढता प्रकोप व आप्तेष्टांच्या लग्नसराईची धावपळ यातच निवडणूकीचे रणशिंग फुंकले गेल्याने ईच्छूक उमेदवारांन बरोबरच उत्साही कार्यकर्तांची धावपळ वाढली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे .
कंधाणे : बागलाण तालुक्याच्या बळीराजाची आर्थिकवाहिनी समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने ऐन लग्नसराईच्या धामधुमीत तालूुयातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. एका बाजूला उष्णतेचा वाढता प्रकोप व आप्तेष्टांच्या लग्नसराईची धावपळ यातच निवडणूकीचे रणशिंग फुंकले गेल्याने ईच्छूक उमेदवारांन बरोबरच उत्साही कार्यकर्तांची धावपळ वाढली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे . अभी नही तो कभी नहीं म्हणत सत्तेच्या सारीपाटातील वजीरांनी ही निवडनुक प्रतिष्ठेची केल्याने जुन्या राजकीय नेत्यांन बरोबर तरु णाईनेही आपले नशीब आजमावण्यासाठी शड्डु ठोकले आहे. कंधाणे गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असल्याने येथे उमेदवारीसाठी ईच्छूकांची संख्या जास्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यंदा नवीन नियमानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक (१० गुंठे क्षेत्र धारक) शेतकºयाला मतदानाचा अधिकार मिळाला असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे. पुरूष मतदारांबरोबरच महिला मतदारांची संख्याही लक्षणीय असल्याने महिला वर्ग मतदानाचा कौल बदलू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय आखाड्यात होत आहे. ही निवडनुक युती व आघाडीतच होईल असे आखाडे राजकीय नेत्यांनकडून वर्तवीले जात असल्याने त्या दुष्टी कोनातून ईच्छूकांनी उमेदवारीसाठी संबधितांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील जाणकार राजकीय नेत्यानी सुकाणू समिती स्थापना करून निवडणुक बिनविरोध पारपाडली होती. तेव्हा तालुक्यातील काही राजकीय नेत्यांचा राजकीय हिरमोड झाला होता. त्यामुळे यंदाची निवडणुक चुरशीची होणार हे निश्चित. यंदाची निवडणुक आजी माजी आमदार व केंद्रीय मंत्री यांच्या भोवतीच फिरणारा असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे . आमदार संजय चव्हाण यांचे तालुक्यातील असलेले जिव्हाळयाचे संबंध यामुळे त्यांच्या कडून उमेदवारी करण्यास ईच्छूकांची संख्या जास्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनीही अल्पावधीतच या भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता वर्ग जमा केला असल्याने उमेदवारी साठी ईच्छूकांची भाऊ गर्दी त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात राहणार आहे . खरे राजकीय चित्र माघारी नंतरच सष्ट होणार असले तरी राजकीय हालचाली गतीमान झाल्या असुन मतदार बळीराजांना ईच्छूकांन कडून येता जाता राम राम न चुकता घातला जात आहे. लग्नसमारंभात न चुकता हजेरी लावली जात आहे. परिसरातील राजकीय धुमाळीत कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.