विभागीय मंडळाचे नवीन कार्यालयात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:20 PM2020-03-01T22:20:42+5:302020-03-01T22:25:35+5:30

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाले असून एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरु असतानाच दुसरीकडे विभागीय मंडळाचे रविवार (दि.१)पासून स्थलांतरही सुरू झाले आहे.  त्यामुळे या परीक्षांचे  नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून झाले असले तरी परीक्षेनंतर तपासून येणाऱ्या गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयातूनच जाहीर केले जाणार आहे. 

Moving to a new office of the Divisional Board | विभागीय मंडळाचे नवीन कार्यालयात स्थलांतर

विभागीय मंडळाचे नवीन कार्यालयात स्थलांतर

Next
ठळक मुद्देविभागीय मंडळाच्या कार्यालयासाठी नवीन इमारत मंडळाच्या नवीन इमारतीसाठी 24 कोटींचा खर्च

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाले असून एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरु असतानाच दुसरीकडे विभागीय मंडळाचे रविवार (दि.१)पासून स्थलांतरही सुरू झाले आहे.  त्यामुळे या परीक्षांचे  नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून झाले असले तरी परीक्षेनंतर तपासून येणाऱ्या गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयातूनच जाहीर  केले जाणार आहे. 
विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासाठी आडगाव येथील पाच एकर जागेवर जवळपास २४ कोटी रुपये खर्चून मंडळासाठी तीन मजली प्रशस्त इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीचे आॅक्टोबर २०१९ पर्यंत विभागीय शिक्षण मंडळाला हस्तांतरण होणे अपेक्षित होते, परंतु डिसेंबर २०१९ उलटूनही इमारतीचे १०० टक्के काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये होणाºया दहावी व बारावीच्या परीक्षांचे कामकाज द्वारका परिसरातील वाणी हाउस येथील इमारतीतूनच करावे लागले होते. परंतु ही इमारात आता पूर्ण झाली तिचा ताबा विभागीय मंडळाला मिळाल्याने  विभागीय मंडळाकडून जून्या कार्यालयातून नवीन कार्यालयात साहित्य स्थलांतरीत करण्याचे काम रविवारपासून सुरू करण्यात आले आहे.  नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाणी हाउस येथील कार्यालयास दरमाह ४ लाख ६९ हजार रुपये इतके भाडे मोजावे लागत होते. शिवाय येथे दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जमा होणाऱ्या उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी सुरक्षित गुदामही नाही.त्यामुळे या उत्तरपत्रिकाही कमी जागेतच साठवून ठेवत त्याची गोपनीयता जपण्याची तारेवरची कसरत मंडळाला करावी लागते. तुलनेच आडगाव येथील पाच एकर जागेत ९२ हजार चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली इमारत विभागीय मंडळाला मिळाली असून साहित्याचे स्थलांतरण पूर्ण झाल्यानंतर मंडळाचे संपूर्ण कामकाज आडगाव येथील स्वमालकीच्या इमारतीतून सुरू होणार आहे. 

 

Web Title: Moving to a new office of the Divisional Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.