शिवसेनेच्या निवडणूक समितीवरून चलबिचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:14+5:302021-05-19T04:15:14+5:30
गेेल्या महापालिका निवडणुकीच्या काळात सेनेला पूरक व पोेषक वातावरण निर्माण झालेले असताना निव्वळ उमेदवार निवड, नातेवाइकांना तिकिटांचे वाटप, वशिलेबाजी ...
गेेल्या महापालिका निवडणुकीच्या काळात सेनेला पूरक व पोेषक वातावरण निर्माण झालेले असताना निव्वळ उमेदवार निवड, नातेवाइकांना तिकिटांचे वाटप, वशिलेबाजी करण्यात आल्याने निवडणुकीत त्याचा फटका सेनेला मोठ्या प्रमाणात बसला. या पराभवाबाबत पक्षानेही दखल घेऊन सविस्तर अहवाल मागविला व त्यानंतर स्थानिक सेना नेतृत्वात मोठे फेरबदल करण्यात आले होते. हा इतिहास ताजा असताना त्याचीच पुनरावृत्ती होते की काय, अशी शंका शिवसैनिक घेऊ लागले आहेत. गेल्या निवडणुकीत या समितीतील काही धुरिणांकडेच उमेदवार निश्चिती व तिकीट वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. आता पुन्हा तसेच होण्याची भीती निष्ठावंत सैनिकांना वाटू लागली आहे. विशेष म्हणजे सेनेचे उपनेते असलेले बबन घोलप, नुकतेच पक्ष प्रवेशिलेले सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, ज्येष्ठ शिवसैनिक जयंत दिंडे यांना मात्र या समितीपासून व निवडणूक निर्णयापासून दूर ठेवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.