छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोजाड

By admin | Published: March 5, 2016 10:06 PM2016-03-05T22:06:42+5:302016-03-05T22:12:18+5:30

छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोजाड

Mozad as the vice president of the camp | छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोजाड

छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोजाड

Next

 देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक बाबूराव मोजाड यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
छावणी परिषदेचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी नगरसेवकांची बैठक छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर प्रदीप कौल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी बाबूराव मोजाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी जाहीर केले. यावेळी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, मावळते उपाध्यक्ष सचिन ठाकरे, ब्रिगेडियर सुधीर सुन्दूबरेकर, मेजर पीयूष जैन, नगरसेवक दिनकर आढाव, भगवान कटारिया, मीना करंजकर, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, कावेरी कासार आदि उपस्थित होते.
छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोजाड यांची निवड जाहीर होताच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून घोषणा देत जोरदार आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मोजाड यांचा विविध मान्यवरांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, संभाजी मोरुस्कर, हभप सदाशिव मोजाड, कर्नल कक्कर, योगेश वाधवा, बळवंत गोडसे, दिनकर पाळदे, तानाजी करंजकर, सुरेखा गोडसे, रतन कासार, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, विलास कुलकर्णी, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, संजय भालेराव, तानाजी भोर, सुभाष खालकर, भगवान जुंद्रे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Mozad as the vice president of the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.