खतांच्या किमती कमी करण्याची खासदार भारती पवार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:24+5:302021-05-17T04:12:24+5:30

दिंडोरी/लासलगाव : नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून येथील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या ...

MP Bharti Pawar's demand to reduce fertilizer prices | खतांच्या किमती कमी करण्याची खासदार भारती पवार यांची मागणी

खतांच्या किमती कमी करण्याची खासदार भारती पवार यांची मागणी

Next

दिंडोरी/लासलगाव : नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून येथील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या विळख्यात सापडून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे आमचा शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यातच सध्या शेतीसाठी खतांची गरज असून या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असून आपण लवकरात लवकर या खतांवरील किमती कमी कराव्यात व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रीय रसायन खाद्य राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच केंद्रीय मंत्रालयाशी फोनद्वारे संभाषण केले असता, त्यांनी या मागणीवर योग्य व सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.

Web Title: MP Bharti Pawar's demand to reduce fertilizer prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.