भारती पवार यांच्या भाजपा प्रवेशाने खासदार हरीश्चंद्र चव्हाण नाराज
By संजय पाठक | Published: March 22, 2019 02:21 PM2019-03-22T14:21:27+5:302019-03-22T14:44:08+5:30
भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून त्यांनी माझ्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही परंतु माझा विचार पक्ष करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक- गेल्या वेळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला अडीच लाख मतांनी पराभूत केल्या त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून त्यामुळे भाजपाचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
खासदारकीची हॅट्रीक करणाऱ्या चव्हाण यांचा सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही अशी भाजपात चर्चा होती. गेल्या लोकसभा निवडणूकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. आताही त्या राष्टÑवादीच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु शिवसेनेतून राष्टÑवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भारती पवार यांची आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपाच्या उमेदवार चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार हरीश्चंद्र चव्हाण वेटींगवर आहेत. त्यातच भारती पवार यांना आज मुंबईत भाजपा प्रवेश देण्यात आल्याने चव्हाण यांची उमेदवारी संकटात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज दुपारी चव्हाण यांची नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक होत आहे.