सांसद आदर्श ग्रामविकाससाठी रायपूर ग्रामपंचायतीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:51+5:302021-07-16T04:11:51+5:30
चांदवड : सांसद आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी चांदवड तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीची ...
चांदवड : सांसद आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी चांदवड तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीची निवड केली. याबाबत रायपूर येथे सांसद आदर्श ग्राम योजनेचे प्रभारी अधिकारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या अद्ययावत करण्याबाबत तालुकास्तरीय अधिकारी व विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. बैठकीत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व गावाचा मूलभूत आणि पायाभूत विकास होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व विभाग यांनी सहभागी होऊन विविध विभाग मार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या सर्व सामूहिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात याव्यात. या सर्व योजनांचे अभिसरण करून ग्रामविकास आराखड्यात सर्व समावेशक कामांचा सहभाग करून शाश्वत स्वरूपाचा आराखडा बनवून याबाबत मार्गदर्शन केले. कामे करण्याबाबत सर्व विभागप्रमुख यांना सूचना दिल्यात. ग्रामपंचायत परिसरात रवींद्र परदेशी व चांदवडचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य व , सहा. गटविकास अधिकारी आर. डी. वाघ, विस्तार अधिकारी सुहास शिंदे , ज्ञानेश्वर सपकाळे, सुनील पाटील , उपअभियंता विजयकुमार कोळी , शाखा अभियंता गरुड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे , शाखा अभियंता व्ही. एच. ठाकरे, ग्रामसेवक सुनील सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. (१५ एमएमजी २)
150721\15nsk_19_15072021_13.jpg
१५ एमएमजी २