खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण
By प्रसाद गो.जोशी | Published: December 2, 2023 12:18 PM2023-12-02T12:18:21+5:302023-12-02T12:19:38+5:30
गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव (चंद्रकांत सोनार) : दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मालेगाव न्यायालयात हजर झाले आहेत.
गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यासाठी आज राऊत मालेगाव दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे सकाळी साडेदहा वाजता मालेगाव येथील विश्रामगृहात आगमन झाले. राऊत मालेगाव येणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, डॉ. सुशील महाजन, नाशिक जिल्हासंपर्क दिंडे आदींसह मालेगाव येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा. संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या बंद दालनात भेटी घेल्यानंतर ११ वाजता ते न्यायालयात हजर झाले.