खासदारांचा मुलगा चालविणार नाशिक कारखाना (कृपया या बातमीचे हेडींग बदलावे)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:16+5:302021-09-16T04:20:16+5:30
दरम्यान कारखान्यातील कामगार संघटना आणि ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने प्राधिकृत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ३० सप्टेंबरपर्यंत कारखाना सुरू करावा, ...
दरम्यान कारखान्यातील कामगार संघटना आणि ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने प्राधिकृत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ३० सप्टेंबरपर्यंत कारखाना सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव बोराडे, कार्याध्यक्ष शिवराम गायधनी, अध्टी विष्णुपंत गायखे शिवाजीराव म्हस्के, ज्ञानेश्वर गायधनी, तुकाराम गायधनी, भाऊसाहेब गायकवाड, उत्तमराव सहाणे, शरदराव टिळे शरद पगार, भाऊसाहेब आडके आदींची नावे आहेत. (फोटो १५ नासाका)
चौकट-
सध्या कारखाना क्षेत्रात ऊस ऊभा आहे. कारखाना सुरू झाला तर हा ऊस वेळेत तुटला जाईल. त्याचबरोबर आपला कारखाना सुरू होत आहे, याचा विश्वास आल्यानंतर पुढील हंगामासाठी कार्यक्षेत्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील, असा विश्वास कामगार व ऊस उत्पादक सभासदांनी व्यक्त केला आहे.
फोटो - जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पिंगळे यांना निवेदन देताना नासाका कामगार संघटनेचे विष्णुपंत गायखे, नामदेवराव बोराडे, शिवराम गायधनी.