श्री जलाराम बाप्पा शोभायात्रा

By admin | Published: November 8, 2016 01:00 AM2016-11-08T01:00:40+5:302016-11-08T00:56:48+5:30

जयंती : विविध धार्मिक कार्यक्रम; समाजबांधवांचा सहभाग

Mr. Jalaram Bappa Shobhayatra | श्री जलाराम बाप्पा शोभायात्रा

श्री जलाराम बाप्पा शोभायात्रा

Next

पंचवटी : श्री जलाराम बापा यांच्या २१७ वी जयंती व जलाराम मंदिराच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्ताने सोमवारी केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. जलाराम बाप्पा जयंतीनिमित्ताने सायंकाळी जलाराम बाप्पा मंदिरातून श्रींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी ७ वाजता मंगल आरतीने जलाराम जन्मोत्सवाला सुरुवात झाली. सचदे कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते जलाराम बाप्पा यांची महापूजा करण्यात आली. यावेळी सुंदरकांड पठण व अन्नकुट दर्शन कार्यक्र म झाला. सायंकाळी मालावीय चौकातील जलाराम बाप्पा मंदिर येथून श्रींच्या सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला मिरवणूकपुढे शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक, गुरुद्वाररोड, वेताळबाबा मंदिर मार्गे, जुना आडगाव नाका व पुढे केवडीबन जलाराम मंदिरात समारोप करण्यात आला. सकाळी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान कार्यक्र म, तर सायंकाळी समूह आरती करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
याप्रसंगी महेश शहा, भाईलाल पुजारा, जगदीश ठक्कर, नरेश दावडा, करसनभाई ठक्कर, भरत सेठिया, हसमुख शिंगाडा, प्रफुल्ल ढोलकिया आदिंसह भाविक मोठ्यास संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)




 

Web Title: Mr. Jalaram Bappa Shobhayatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.