शिरवाडे वणीत महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:40 PM2021-03-18T20:40:33+5:302021-03-19T01:20:24+5:30

शिरवाडे वणी : येथील परिसरात महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज तोडणीची धडक मोहीम सुरू केली असून वीज रोहित्र बंद करण्यात येत आहे.

MSEDCL action in Shirwade Wani | शिरवाडे वणीत महावितरणची कारवाई

शिरवाडे वणीत महावितरणची कारवाई

Next
ठळक मुद्देभाजीपाल्यासह द्राक्ष पिकांना कवडीमोल भाव

शिरवाडे वणी : येथील परिसरात महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज तोडणीची धडक मोहीम सुरू केली असून वीज रोहित्र बंद करण्यात येत आहे. दरम्यान, शेतकरी वर्गाला किमान मार्चअखेरपर्यंत वीजबिल भरण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत भाजीपाल्यासह द्राक्ष पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, अशा काळात महावितरणकडून अचानकपणे वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असल्यामुळे सध्याच्या स्थितीत कांदे, गहू व द्राक्षे यांना अखेरचे पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहे.

 

Web Title: MSEDCL action in Shirwade Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.