महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढ प्रस्तावास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:06 AM2018-08-07T01:06:17+5:302018-08-07T01:06:32+5:30
महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढीबाबत सोमवारी (दि. १३) होणाऱ्या सुनावणीत वीजदरवाढीला विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट वीजग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यावेळी उपस्थित होते. आयोगाची सुनावणी म्हणजे केवळ औपचारिकता न राहता त्यात ग्राहकांच्या हिताचा विचार करणे अपेक्षित असल्याचे प्रताप होगाडे यावेळी म्हणाले.
सातपूर : महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढीबाबत सोमवारी (दि. १३) होणाऱ्या सुनावणीत वीजदरवाढीला विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट वीजग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यावेळी उपस्थित होते. आयोगाची सुनावणी म्हणजे केवळ औपचारिकता न राहता त्यात ग्राहकांच्या हिताचा विचार करणे अपेक्षित असल्याचे प्रताप होगाडे यावेळी म्हणाले.
राज्य वीज नियामक आयोगास सादर करण्यात आलेल्या दरवाढीची सुनावणी सोमवार दि.१३ रोजी नाशिकला घेण्यात येणार आहे. या पाशर््वभूमीवर रविवारी निमात बैठक घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे खास उपस्थित होते. होगाडे यांनी सांगितले की, विजेचे दर हे अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असून, राज्यातील उद्योगांना अन्य राज्यांतील उद्योगांबरोबरच राज्यांतर्गत स्पर्धेस तोंड द्यावे लागत आहे. फिडर इनपूट प्रणाली, कॅप्टीव्ह प्रणाली, ओपन अॅक्सेसप्रणाली यांचा अवलंब केल्यास राज्यातील उद्योगांना माफक वीज उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांनी वीजदरवाढीमुळे होणाºया परिणामांची माहिती दिली, तर निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी निमाकडून शासन दरबारी करण्यात येणाºया पाठपुराव्याची माहिती दिली. जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे, वीजग्राहक समिती सचिव सिद्धार्थ सोनी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर, शशिकांत जाधव, कैलास अहेर, संजीव नारंग, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन आदींनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी संदीप भदाणे, मनीष रावळ, उदय रकिबे, हिमांशू कनानी, बाळासाहेब गुंजाळ, एन. डी. ठाकरे, नीलिमा पाटील, राजेंद्र जाधव, रावसाहेब रकिबे, राजेश गडाख, बी.जी. पालवे, दिनेश दवे, योगेश साठे, गिरीश मोहिते, प्रशांत देवळे, प्रीतेश कासार, राजन मुठाणे, एन. के. गांगुर्डे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.
सुनावणीवर बहिष्कार, वीजबिलाची होळी करणार
राज्य वीज नियामक आयोगाच्या सुनावणीदरम्यान तीव्र विरोध करून दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावावा, सुनावणीवर बहिष्कार टाकावा, महावितरणचे मुख्य अभियंता आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करावी, विविध औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून निवेदन द्यावे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अशा विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर सुनावणीप्रसंगी तीव्र विरोध करावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. वीजदरवाढीचा प्रस्ताव स्वीकारल्यास कोणते आंदोलन करता येईल, याचा निर्णय निमाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.