महावितरणचे कनिष्ट अभियंता अभिनय निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:36+5:302021-04-02T04:15:36+5:30
महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले कनिष्ट अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आले आहे. ...
महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले कनिष्ट अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आले आहे. वीज बिल भरणा केल्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यास शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी निवृत्ती बोराडे यांनी वीज बिल भरणा केल्यानंतर वीज जोडणी करण्यासाठी त्यांनी महावितरणचे कनिष्ट अभियंता अभिनय बोरकर यांना फोन केला होता. बोरकर यांनी त्यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली होती. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा निर्णय होत अभिनय बोरकर यांना निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.