महावितरणचे २० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:31 PM2020-06-09T21:31:28+5:302020-06-10T00:10:54+5:30

येवला : शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.

MSEDCL loses Rs 20 lakh | महावितरणचे २० लाखांचे नुकसान

महावितरणचे २० लाखांचे नुकसान

Next

येवला : शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.
महावितरणने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी संपूर्ण भागामध्ये पथके तयार केली होती. ८ सहायक अभियंता व ४८ कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून शहरासह व ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला.
विनायक इंगळे, महेश जगताप, स्वनिल दुसाने, सुनील सातदिवे, धनंजय पाटील, सूरज हुरपडे व भालचंद्र जाधव आदींनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, महावितरणने नुकसानीबाबत प्रांताधिकारी सोपान कासार व तहसीलदार रोहिदास वारूळे यांना कळविले आहे.

Web Title: MSEDCL loses Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक