वीजचोरांना महावितरणाचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 06:32 PM2021-01-30T18:32:37+5:302021-01-30T18:33:17+5:30

पिंपळगाव बसवंत : वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रकमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगावच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा सुरू करत आतापर्यंत ६८ ग्राहकांवर गुन्हे दाखल करत १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आतापर्यंत १४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

MSEDCL shocks power thieves | वीजचोरांना महावितरणाचा शॉक

वीजचोरांना महावितरणाचा शॉक

Next
ठळक मुद्देपिंपळगावी ६८ ग्राहकांवर कारवाई : १८ लाख ११ हजारांचा दंड

पिंपळगाव बसवंत : वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रकमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगावच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा सुरू करत आतापर्यंत ६८ ग्राहकांवर गुन्हे दाखल करत १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आतापर्यंत १४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपळगाव विभागामार्फत ३८ गावांमध्ये २८ हजार शेती व घरगुती वीज ग्राहक आहेत, पण दोन कोटी ४० लाख रुपये मासिक बिलाच्या उद्दिष्टापेक्षा विजेचा वापर अधिक होत होता. त्यामुळे चोरीतून वीज गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पिंपळगाव बसवंत , पालखेड, दावचवाडी, साकोरे, वरखेडा, खेडगाव, पाचोरेवणी, चिंचखेड, कोकणगाव, जवळके वणी, उंबरखेड आदी ११ गावातील वीजचोरांवर लाखो रुपयांचा दंड ठोकत वीजचोरीचा शॉकच दिला. सहाय्यक अभियंता नितीन पगारे, मंगेश नागरे, चंद्रशेखर निकम, रामप्रसाद थोरात, योगेश नाठे, विकास गायकवाड आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वीजचोरांचे धाबे दणाणले
पालखेड, ओझरखेड कालव्याला आवर्तन सुरू असल्याने शेतीला पाणी भरण्यासाठी वीज कंपनीला आकडे टाकून वीजपुरवठा घेतला गेला. उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा सत्र सुरू केला असता यात आकडे टाकून अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्या पथकांच्या निदर्शनास आले तर मीटरमध्ये छेडछाड असे प्रकार उघडकीस आले. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले असून ६८ जणांवर झालेल्या कारवाईत १८ लाख ११ हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून आतापर्यंत ५१ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आकडे टाकण्यासाठी वापरलेली वायर, छेडछाड केलेले मीटर जप्त करण्यात आले आहे. 

Web Title: MSEDCL shocks power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.