महावितरणचे व्यवहार होणार आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:30 AM2018-04-24T00:30:13+5:302018-04-24T00:30:13+5:30

डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारा-संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयांतील देयके थेट कंत्राटदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 MSEDCL will be transacted online | महावितरणचे व्यवहार होणार आॅनलाइन

महावितरणचे व्यवहार होणार आॅनलाइन

Next

नाशिक : डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारा-संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयांतील देयके थेट कंत्राटदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.  सध्या महावितरणमध्ये स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या कामांची बिले धनादेशच्या स्वरूपात देण्याची प्रक्रि या राबविण्यात येते. यामुळे या सर्व प्रक्रि येस काही प्रमाणात विलंब लागतो. त्यामुळे आर्थिक कामकाजात अधिक गतिमानता, पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित सॅप प्रणालीद्वारे केंद्रीकृत देयक अदा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या केंद्रीकृत प्रणालीतून कंत्राटदारांचे दरमहा सुमारे २० हजार आर्थिक व्यवहार हाताळले जाणार आहेत. अपारंपरिक वीज खरेदीशी संबंधित ५ ते ६ हजार आर्थिक व्यवहाराची ही प्रक्रिया यापूर्वीच महावितरणने सुरू केलेली आहे. याशिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित ७५ ते ८० हजार एवढ्या आर्थिक व्यवहारासाठी ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी कंत्राटदारांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराने बँकेच्या तपशीलासह व्हेंडर नंबर, मोबाइल नंबर आणि ईमेल इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.
कर्मचायांना मिळणार प्री-पेड कार्ड
रोख व्यवहार कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयातील दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी महावितरणच्या कर्मचाºयांना प्री-प्रेड कार्ड देण्यात येणार आहेत. राज्यभरात सुमारे २ हजार कर्मचाºयांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्डद्वारे ते आपल्या कार्यालयातील प्रशासकीय बाबी संबंधीचा खर्च करू शकणार आहेत.

Web Title:  MSEDCL will be transacted online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज