अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी

By azhar.sheikh | Published: March 3, 2018 08:52 PM2018-03-03T20:52:10+5:302018-03-03T20:52:10+5:30

नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात.

 Mtdc will change the way of Navnath Pradakshina road in Ahmednagar district: | अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी

अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी

Next
ठळक मुद्देनऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य स्वतंत्ररीत्या नवनाथ प्रदक्षिणा मार्ग धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरविले पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) कालबद्ध कृती आराखडा

नाशिक : राज्यातील सामाजिक-धार्मिक महत्त्व असलेल्या स्थळांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करत धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील मढी व श्री सिद्ध नवनाथ स्थानाच्या प्रदक्षिणा मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) कालबद्ध कृती आराखडा तयार करत असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. पर्यटनाच्या दृष्टीने वाव असलेले हे धार्मिक स्थळ अद्याप उपेक्षित असून, विकासापासून कोसो दूर राहिल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता; मात्र पर्यटन महामंडळाने याबाबत दखल घेऊन धार्मिक पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी स्वतंत्ररीत्या नवनाथ प्रदक्षिणा मार्ग धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरविले आहे. अहमदनगरच्या वांबोरीपासून पूर्वेकडून बीड-उस्मानाबादकडे गेलेला सह्याद्रीचा डोंगर. या डोंगराच्या वांबोरी ते बीडच्या रायमाहपर्यंतच्या सुमारे ११५ कि.मी.च्या डोंगर परिसराला गर्भगिरी म्हटले जाते. या गर्भगिरीमध्ये एकवटलेली नवनाथांची स्थाने भारतभरात कोठेही आढळत नाही. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक गर्भगिरी प्रदक्षिणेसाठी हजेरी लावतात, अशी माहिती माजी सनदी अधिकारी रघुनाथ राठोड यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे उपस्थित होते.
आदिनाथ वृद्धेश्वराचे मंदिर हे गर्भगिरीचे केंद्र असून त्याबरोबरच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ यांची समाधीस्थळे आहेत. गोरक्षनाथ, अडबंगनाथ, बाळनाथ यांची साधनास्थळे आहेत. तसेच ब्राह्मणी-सोनई-वांबोरी-रामेश्वर, सावरगाव येथेदेखील त्यांच्या विहार-वास्तव्याची स्मृतिस्थळे असल्याचे राठोड म्हणाले. हा संपूर्ण परिसर नवनाथ प्रदक्षिणा मार्ग म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण परिसराचा विकास महामंडळाच्या वतीने साधला जाणार आहे. यासाठी स्वतंत्ररीत्या कृ ती आराखडा आखण्यात आला असून, विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.



महामंडळाची बससेवा
परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागासोबत संपर्क साधून या प्रदक्षिणा मार्गावर बससेवा उपलब्ध क रून देत पॅकेज टूरबाबत विचार करावा, यादृष्टीने पर्यटन महामंडळाने पत्रव्यवहार केला होता. यास महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार पॅकेज टूर वरील मार्गाला लक्षात घेऊन प्रस्तावित करण्याचे प्रयोजन सुरू असल्याचे राठोड यावेळी म्हणाले.

 

Web Title:  Mtdc will change the way of Navnath Pradakshina road in Ahmednagar district:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.