मुहूर्तावर लाभली सोन्याला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:54 AM2018-04-19T00:54:16+5:302018-04-19T00:54:16+5:30

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्ताने नाशिककरांनी बुधवारी (दि. १८) खरेदीसाठी उत्साह दाखविल्याने बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला अधिक पसंती दिल्यामुळे सोन्याला झळाळी प्राप्त झाली असून, सोन्याच्या भावाने ३१ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच ग्राहकांनी घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीलाही प्राधान्य दिल्याने दिवसभर बाजारपेठेत उत्साह दिसून आला.

Much of the brightness rose on gold | मुहूर्तावर लाभली सोन्याला झळाळी

मुहूर्तावर लाभली सोन्याला झळाळी

Next
ठळक मुद्देअक्षय्य तृतीया : सराफी दालनांमध्ये ग्राहकांची गर्दी सोन्याच्या भावाने ३१ हजार रुपयांचा टप्पा पार केला

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्ताने नाशिककरांनी बुधवारी (दि. १८) खरेदीसाठी उत्साह दाखविल्याने बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीला अधिक पसंती दिल्यामुळे सोन्याला झळाळी प्राप्त झाली असून, सोन्याच्या भावाने ३१ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच ग्राहकांनी घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीलाही प्राधान्य दिल्याने दिवसभर बाजारपेठेत उत्साह दिसून आला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेली संपत्ती, मालमत्ता अक्षय राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवशी बाजारात दरवर्षी उत्साह दिसून येतो. परंतु गेल्या तीन-चार वर्षांच्या दुष्काळामुळे आणि केंद्र सरकारच्या नोटाबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांमुळे बाजारात उत्साह कमी झाला होता. परंतु यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नाशिककरांनी नियोजन करून खरेदी केली. पंतप्रधान आवास योजनेमुळे तसेच गृहकर्जावरील व्याजदर कपातीमुळे घर खरेदीला मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांनी पसंती दिली. यात फ्लॅट, रो हाउससह अनेकांनी बंगलो खरेदीलाही उत्साह दाखविला.

मुहूर्तावर लाभली सोन्याला झळाळी
(पान १ वरून)
वाहन आणि सोने-चांदीच्या वस्तू खरेदीलाही चांगला प्रतिसाद लाभल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यंदा बांधकाम व्यावसायिक, सराफी पेढ्या, इलेक्ट्रॉॅनिक्सच्या दालनामध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. सोन्याच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार, देश-विदेशांतील व विविध प्रांतांतील घडणावळीचे दागिने सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले होते. त्यातच लग्नसराई असल्यामुळे विवाह असणाऱ्या कुटुंबीयांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली. मध्यमवर्गीय ग्राहकांकडून सोने खरेदीला प्रतिष्ठेपेक्षा गुंतवणूक म्हणूनच अधिक प्राधान्य दिले गेले. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात सतत वाढ होत असतानाही ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिली. दोन दिवसांपासून सोन्याचा भाव सुमारे ३१ हजार ६०० ते ३१ हजार ७०० रुपये प्रतितोळा असतानाही ग्राहकांनी दरवर्षीपेक्षा यावषीर्ही सोने खरेदीला प्राधान्य दिल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
इन्फो-
बांधकाम व्यवसायाला प्रतिसाद
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदी करणाºया ग्राहकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर असून, वेगवेगळ्या भागातील बांधकाम प्रकल्पांना बुधवारी ग्राहकांनी भेट देऊन आपले स्वप्नातील घर खरेदीच्या दृष्टीने पाऊल टाकले. अनेक ग्राहकांनी घराचे बुकिंग केले, तर काही जणांनी अक्षय्य तृतीयेच्याच मुहूर्तावर घराचा ताबा घेतला. विविध बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट देणाºया ग्राहकांसाठी वाहनांची व्यवस्थाही केली होती. त्यामुळे वेगवगेळ्या निर्माणाधिन व पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पांच्या परिसरात ग्राहकांची वर्दळ दिसून आली. यातील काही ग्राहकांनी घर खरेदीविषयी चर्चा केली नसली तरी ते भविष्यातील ग्राहक असल्याच्या प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत. नाशिककरांनी साधला मुहूर्त सोने खरेदी हा भारतीयांचा आवडता विषय असून, विविध सण-समारंभाच्या निमित्ताने सोने खरेदी केली जाते. त्यातील एक सण म्हणजे अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त साधत नाशिककरांनी ठोक सोन्यासह वेगवेगळ्या सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सराफ बाजार दिवसभर गर्दीने फुलून गेला होता. अनेक ग्राहकांनी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या दागिन्यांचीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केल्याने गुढीपाडव्यापेक्षा अक्षय्य तृतीयेला अधिक खरेदी झाल्याचे सराफांनी सांगितले.

Web Title: Much of the brightness rose on gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक