निमाणी बसस्थानकात चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:19 AM2018-07-09T00:19:37+5:302018-07-09T00:20:34+5:30

पंचवटी : परिसरात शनिवारी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे निमाणी बसस्थानकात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवासी वर्गाचे हाल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निमाणी बसस्थानकातील रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता त्याच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने एसटी प्रशासनाचे स्थानकाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

Mud at the Nimani bus stand | निमाणी बसस्थानकात चिखल

निमाणी बसस्थानकात चिखल

Next
ठळक मुद्देप्रवाशांची तारांबळ : एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष

पंचवटी : परिसरात शनिवारी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे निमाणी बसस्थानकात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवासी वर्गाचे हाल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निमाणी बसस्थानकातील रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता त्याच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने एसटी प्रशासनाचे स्थानकाकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
पावसाळा सुरू होऊन पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही, मात्र अत्यल्प पावसामुळे निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून काही प्रमाणात खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे एसटी बसेस बाहेर नेताना व स्थानकात आणताना वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो.
निमाणी बसस्थानकातून शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्यातरी या चिखलमय मार्गातूनच ये-जा करावी लागत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरु वातीलाच खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरल्याने शेकडो प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Mud at the Nimani bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.