कादवाचे पेमेंट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:31+5:302021-01-23T04:15:31+5:30
गेल्या वर्षी २२ जानेवारीस १,०२,७१६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा दुपटीहून अधिक गाळप झाले आहे. यंदा कोरोनामुळे ...
गेल्या वर्षी २२ जानेवारीस १,०२,७१६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा दुपटीहून अधिक गाळप झाले आहे. यंदा कोरोनामुळे मिठाई दुकाने बंद राहिल्याने साखर विक्रीत मोठी घट झाल्याने मागील वर्षीचा साठा शिल्लक आहे. अजूनही साखरेला अत्यंत कमी भाव मिळत असून साखरेची विक्री कमी प्रमाणात होत आहे. भुस्सा मळीचेही भाव कमी असल्याने यंदा एफआरपी रक्कम कशी द्यायची, हा प्रश्न राज्यातील साखर कारखान्यांपुढे उभा राहिला आहे. सरकारने साखर निर्यात धोरण जाहीर केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीस अडचणी येत आहेत. शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान येणे बाकी असून ते मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अशा बिकट स्थितीत सर्व साखर कारखाने वाटचाल करीत असताना कादवाने उसाच्या बिलापोटी पहिला हप्ता १८८५ रुपये दिला होता व आता ३१ डिसेंबरपूर्वी गाळप झालेल्या ऊस बिलापोटी २४० रुपयांचा दुसरा हप्ता दिला. १ जानेवारीपासून गाळप झालेल्या ऊसबिलापोटी पहिला हप्ता २१२५ रुपये अदा केला जाणार आहे. कार्यक्षेत्रात ऊसतोड वाढविण्यात आली असून यंदा २७०० ते ३००० मेट्रिक टन दरम्यान प्रतिदिन गाळप सुरू असल्याने वेळेत सर्व ऊसतोड पूर्ण होणार आहे. कादवाने इथेनॉल डिस्टीलरी प्रकल्पाची तयारी सुरू केली असून त्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून लवकरच प्रत्यक्ष प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. या वेळी व्हा. चेअरमन उत्तम भालेराव यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक हेमंत माने व खातेप्रमुख उपस्थित होते.