टाकळी रस्त्यावर पालापाचोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:34+5:302021-05-19T04:14:34+5:30

मलनिस्सारण केंद्राची दुर्गंधी वाढली नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रातून दुर्गंधी अधिक प्रमाणात येत असल्याची नागरिकांनी ...

The muddy streets of Takli | टाकळी रस्त्यावर पालापाचोळा

टाकळी रस्त्यावर पालापाचोळा

Next

मलनिस्सारण केंद्राची दुर्गंधी वाढली

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रातून दुर्गंधी अधिक प्रमाणात येत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. पावसाच्या सरी काेसळताच या केंद्राच्या परिरसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. विशेषत: पहाटेच्या सुमारास या केंद्रातून दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते.

जेलरोड परिसरात फलक कोलमडले

नाशिक: जेलरोड, नारायणबापू नगर तसेच जेलटाकी परिसरात लावण्यात आलेले श्रद्धांजलीचे अनेक फलक वाऱ्यामुळे उन्मळून पडले आहेत. याबरोबरच अनेक दुकानांवरील जाहिरातीचे फलक देखील जमिनीवर आले. टपऱ्यांवरील मेनकापडाचे छप्पर देखील उडून गेल्याचे दिसून आले.

आम्रपाली झोपडपट्टीत दूषित पाणीपुरवठा

नाशिक: उपनगर-जेलरोड मार्गावरील आम्रपाली झोपडपट्टीत असलेल्या नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गेल्या शनिवारपासून कमी दाबाने पाणी येत असतांना आता दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: The muddy streets of Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.