खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील वारकऱ्यांना मफलरचे वाटप
By admin | Published: January 17, 2017 11:30 PM2017-01-17T23:30:42+5:302017-01-17T23:31:07+5:30
खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील वारकऱ्यांना मफलरचे वाटप
खामखेडा : येथून लायकेश्वर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी पालखीचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाले. गेल्या दहा वर्षांपासून खामखेडा येथील श्रीक्षेत्र लायकेश्वर येथून त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी सोहळा दिनानिमित्ताने स्वर्गीय महादू तारू (बाबा) यांच्या कृपाशीर्वादाने व दिंडीचे संस्थापक गोरख शेवाळे, माजी सैनिक जयराम शेवाळे, सुभाष बिरारी आदिंच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. लायकेश्वर येथे निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या दिंडीचे खामखेडा गावाच्या चौफुलीवर भव्य स्वागत करण्यात आले. सध्या थंडीचे दिवस असल्याने गुरुदत्त पुरु ष गटाच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना मफलरचे वाटप करण्यात आले. यावेळी देवळा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विनोद देवरे, सोमनाथ जगताप, मिलिंद पगार, वसाका संचालक अण्णा पाटील, उपसरपंच संतोष मोरे, सुनील शेवाळे, विश्वास शेवाळे, सोसायटीचे चेअरमन नानाजी मोरे, गुरु दत्त पुरु ष गटाचे अध्यक्ष महेश शिरोरे, सुनील शेवाळे, नारायण शेवाळे, किरण चिमनपुरे, दत्तू भदाणे, जितेंद्र अहेर, सुभाष बिरारी आदि उपस्थित होते. सदर दिंडी खामखेडा येथून पिळकोस, बगडू, भेंडी, दह्याणे, कुडाने, बाबापूर, मावडी, बोपेगाव, पालखेडा, मोहाडी, शिवनई, म्हसरूळ, नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहे. या पायी दिंडी सोहळ्यातील भाविकांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था बगडू, कुंडाणे, मावडी, पालखेड, शिवनई, नाशिक, महिरावणी आदि ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे, तर सायंकाळच्या भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था दह्याणे, बाबापूर, बोपेगाव, मोहाडी, म्हसरूळ, पिपळगाव आदि ठिकाणच्या गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)