मफलर, टोपीसाठी लागणार दहा रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:43 AM2019-09-29T00:43:40+5:302019-09-29T00:44:00+5:30

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, नेत्यांच्या सभा किंवा यात्रा होणार असेल तर पक्षचिन्ह असलेली टोपी किंवा मफलर हमखास वापरली जाते. मात्र अशा प्रकारच्या प्रति मफलर आणि टोपीसाठी दहा रुपये मोजावे लागतील. याशिवाय कापडी बॅनर्स तसेच अन्य प्रचारांचे दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत.

 The muffler, the hat will cost ten bucks | मफलर, टोपीसाठी लागणार दहा रुपये

मफलर, टोपीसाठी लागणार दहा रुपये

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, नेत्यांच्या सभा किंवा यात्रा होणार असेल तर पक्षचिन्ह असलेली टोपी किंवा मफलर हमखास वापरली जाते. मात्र अशा प्रकारच्या प्रति मफलर आणि टोपीसाठी दहा रुपये मोजावे लागतील. याशिवाय कापडी बॅनर्स तसेच अन्य प्रचारांचे दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यानिमित्ताने पक्षचिन्हाचे पोस्टर बॅनर्स वापरले जात आहेत. आदर्श आचारसंहिता लागू करण्यापूर्वी काहीही निर्बंध नसले तरी आता मात्र प्रत्येक प्रचार साहित्याची नोंद त्याचा खर्च नोंदवला जाणार आहे. कोणत्याही चौक सभा किंवा खासगी मालमत्तेच्या जागेवर प्रचार साहित्य लावण्याचेदेखील दर आहेत त्यानुसार कापडी बॅनरसाठी २०० रुपये, जाहिरात फलकासाठी तीनशे, तर झेंडे दहा रुपये प्रति नग असा खर्च असेल. पोस्टर बॅनर, झेंडे, प्रचारचे मफलर, टोपी सभेच्या ठिकाणी वापरल्यास त्यासाठी प्रति नग १० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी कापडी बॅनर्ससाठी (तीन बाय दोन फूट) २०० रुपये, खासगी जागेवर जाहिरात फलक (दहा बाय दहा) साठी तीनशे रुपये प्रति नग असा दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय निवडणुकीसाठी बुथ उभारल्यास दीडशे रुपये प्रति बुथ, दहा बाय दहा अकारचे बुथसाठी ९०० रुपये असे दर आहेत.
चौक सभा स्वस्तात
जाहीरसभांसाठी मोठी मैदाने महाग, तर ठरतातच शिवाय त्याठिकाणी मंडप उभारणी आणि अन्य खर्चदेखील खूप असतो. त्या तुलनेत चौक सभा सर्वांत स्वस्त पडतात. चौकात सभा घेण्यासाठी अडीचशे रुपये मोजावे लागतील.

Web Title:  The muffler, the hat will cost ten bucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.