मंगळागौरीच्या खेळांमध्ये प्रेक्षक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:31 AM2018-08-12T00:31:14+5:302018-08-12T00:31:46+5:30
रिमझिम पावसाच्या सान्निध्यात रंगलेला मंगळागौरीचा खेळ, नऊवारी, नथ, अंबाडा अशा पारंपरिक वेशभूषेत होत असलेले सादरीकरण, गाण्याच्या सादरीकरणासाठी लाटणे, सूप, दिवे, परडी आदी साहित्यांचा होत असलेला वापर, प्रत्येक खेळ व गाण्याआधी त्याचा इतिहास, पार्श्वभूमी सांगणारे निवेदन या साऱ्यांमुळे प्रेक्षक दंग झाले होते.
नाशिक : रिमझिम पावसाच्या सान्निध्यात रंगलेला मंगळागौरीचा खेळ, नऊवारी, नथ, अंबाडा अशा पारंपरिक वेशभूषेत होत असलेले सादरीकरण, गाण्याच्या सादरीकरणासाठी लाटणे, सूप, दिवे, परडी आदी साहित्यांचा होत असलेला वापर, प्रत्येक खेळ व गाण्याआधी त्याचा इतिहास, पार्श्वभूमी सांगणारे निवेदन या साऱ्यांमुळे प्रेक्षक दंग झाले होते.
निमित्त होते ‘नाच गं घुमा’ मंगळागौरी खेळ स्पर्धेचे. उंटवाडीजवळील लक्षिका मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नाशिक महिला आघाडीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढील पिढ्यांपर्यंत हे खेळ पोहोचविण्यास या माध्यमातून मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक ग्रुपला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. याप्रसंगी वृंदा लवाटे, वर्षा डांगरीकर, भाग्यश्री जोशी, वैभवी लोहकरे, संगीता दातार, सीमा देशपांडे, गंधा वारे, प्रणाली लाखे, आसावरी धर्माधिकारी, सुमेधा जोशी आदी उपस्थित होते. स्वाती राजवाडे, नूपुर सावजी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.