सामनगाव रस्त्याच्या प्रलंबित कामाला लागला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:40 AM2019-06-04T00:40:50+5:302019-06-04T00:41:09+5:30
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सामनगाव रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त लागला. असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन किलोमीटर लांबीच्या कामाला एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
एकलहरे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सामनगाव रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त लागला. असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन किलोमीटर लांबीच्या कामाला एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सामनगाव गावठा हद्दीतील चाडेगाव फाटा ते नवीन सामनगाव या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने रखडले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर होऊन, प्रत्यक्ष कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कडेला खडी टाकण्यात आली आहे, तर पाइप टाकून मोऱ्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार योगेश घोलप, सरपंच मीराबाई घायवटे, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामविकास अधिकारी बापू पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सध्या युद्धपातळीवर या रस्त्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत पाणी वाहून जाण्यासाठी ठिकठिकाणी पाइप टाकून मोऱ्यांची कामे मार्गी लागली आहेत. सामनगाव गावठा ते सिद्धार्थनगरपर्यंत संपूर्ण रस्त्यावर स्ट्रिट लाइटची उभारणी करुन संपूर्ण रस्ता प्रकाशमय करण्यात आला आहे. सामनगावातही हायमास्ट बसविण्यात आले आहेत, अशी माहिती उपसरपंच सचिन जगताप यांनी दिली.