‘कालिदास’ उद्घाटनाला स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:22 AM2018-08-12T01:22:51+5:302018-08-12T01:24:11+5:30

नाशिक : नूतनीकरणानंतर रखडलेला महाकवी कालिदास कलामंदिरचा लोकार्पण सोहळा अखेर कलावंतांच्या सादरीकरणातून होणार असून त्यासाठी पूर्वतयारी बैठक शनिवारी (दि. ११) पार पडली. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकार्पण करण्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

Muhurat of Independence Day in 'Kalidas' inauguration | ‘कालिदास’ उद्घाटनाला स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त

‘कालिदास’ उद्घाटनाला स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त

Next
ठळक मुद्देनेते ना मंत्री कलावंतांच्या सादरीकरणातून होणार लोकार्पण

नाशिक : नूतनीकरणानंतर रखडलेला महाकवी कालिदास कलामंदिरचा लोकार्पण सोहळा अखेर कलावंतांच्या सादरीकरणातून होणार असून त्यासाठी पूर्वतयारी बैठक शनिवारी (दि. ११) पार पडली. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकार्पण करण्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी शुक्रवारी बोलाविलेल्या बैठकीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रंगमंच पूजन करून लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर
१५ ते १९ आॅगस्ट दरम्यान उद्घाटनानिमित्ताने स्थानिक कलावंतांच्या सादरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नाटक, एकांकिका, वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य, बालनाट्य आदी कार्यक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे. बैठकीत जयप्रकाश जातेगावकर, राजेश शर्मा, सुनील ढगे, रवींद्र कदम, प्रकाश साळवे, कीर्ती भवाळकर, विवेक गरुड, श्याम लोंढे, नवीन तांबट, सतीश सावंत, सुरेश गायधनी, राजेंद्र तिडके आदी यावेळी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिकच्या कालिदास कलामंदिरचे रूपडे पालटले असून त्याच्या उद्घाटनाविषयी म्हणजेच लोकार्पणाविषयी चर्चा रंगली होती. विशेषत: स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांनी पाहणी केली केली. त्यावेळीपासून उद्घाटनाचा वाद रंगू लागला होता. कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालन आपल्या प्रभागात असल्याने आपल्याला विश्वासात घ्यावे, अशी मागणी शाहू खैरे यांनी केली होती.

Web Title: Muhurat of Independence Day in 'Kalidas' inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.