मुहूर्ताच्या खरेदीला उधाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:10 AM2017-10-01T01:10:29+5:302017-10-01T01:10:35+5:30
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत दसºयाच्या मुहूर्तावर नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. त्यामुळे बाजारपेठांना झळाळी प्राप्त झाली असून, घर खरेदीपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तू तसेच वाहनखरेदीत कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.
नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत दसºयाच्या मुहूर्तावर नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. त्यामुळे बाजारपेठांना झळाळी प्राप्त झाली असून, घर खरेदीपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तू तसेच वाहनखरेदीत कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाच्या दिवशी ग्राहकांनी नवनवीन वस्तूंची खरेदी केली. तसेच सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांचे शोरूम ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेले होते. विजयादशमीला सोने खरेदी करावे, अशी परंपरा असल्याने आणि यंदा पाऊसही चांगला झाल्याने शेतकरीवर्गही खूश आहे. त्यामुळे सराफ बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. अनेकांनी दसºयाच्या मुहूर्तावर कागदपत्रांची पूर्तता करून वाहनांची चावी हातात घेतली. शून्य टक्के व्याजदरावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध असल्याने टीव्ही, फ्रीज यांची धडाक्यात विक्री झाली. अनेकांनी बुकिंग केलेल्या घरांचा ताबा घेतला, तर काहींनी गृहप्रवेशासाठी दसरा हा मुहूर्त साधला. या शुभमुहूर्तावर केलेली खरेदी लाभदायी ठरत असल्याचा समज असल्याने शहरात नवीन घरांची बुकिंगही मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती रिअल इस्टेट तज्ज्ञांनी दिली.
दसºयाच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या कंपन्यांनी विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या असताना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभण्याची अपेक्षा होती. त्यानुसार व्यावसायिकांनी तयारी करून नवनवीन उत्पादन विक्रीसाठी ठेवले आहे. मात्र बाजारात संभ्रमावस्था असल्याने ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही त्यामुळे सकाळचे सत्र इतर दिवसांप्रमाणेच निरुत्साही वातावरणात गेले. - राजेंद्र पारख, संचालक, पारख इलेक्ट्रॉनिक्स
गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा दसºयाच्या पार्श्वभूमीवर ५० टक्केच व्यवसाय होत आहे. यात प्रामुख्याने नवीन तंत्रज्ञानाच्या टीव्हीला अधिक मागणी आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत व्यवसाय कमी होत असला तरी काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात असलेले मंदीचे वातावरण काही प्रमाणात का होईना कमी होत असल्याने दिवाळीच्या कालावधीतच चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. - राहुल हिसारिया, संचालक, उत्तम इलेक्ट्रॉनिक्स
दसºयाच्या मुहूर्तावर वाहन ताब्यात मिळावे म्हणून अनेकांनी बुकिंग केले होते. त्यामुळे बहुतांश ग्राहक चावी हातात घेऊन कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत, तर रोखीने खरेदी करणारे ग्राहकही आहेत, तसेच अनेकजण दिवाळीला वाहनखरेदी करण्यासाठी बुकिंग करीत आहेत. कंपन्यांनी वेगवेगळ््या सवलती जाहीर केल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रकाश खैरनार, विक्री व्यवस्थापक, कमल आॅटोकेअर
दसºयाच्या वाहन खरेदीमुळे बाजारातील मरगळ दूर झाली असून, वाहन बाजार मंदीतून उभारी घेत आहे. परंतु, नियमित दसरा-दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर होणाºया वाहन खरेदीच्या तुलनेत या दसºयाला १० टक्के कमी विक्री झाली आहे. यात मालवाहतुकीच्या वाहनांच्या विक्रीत घट झाली असून व्यावसायिक आणि प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचाही कमी-अधिक प्रमाणात समावेश आहे. - प्रितेश शाह, संचालक, जितेंद्र व्हिल्स.