टाकेद येथे मुक श्रध्दांजली मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 07:56 PM2019-02-19T19:56:33+5:302019-02-19T19:58:52+5:30
सर्वतीर्थ टाकेद : नुकत्याच पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जैशे-ए-मोहंम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी. या मागणीसाठी व शहिद झालेल्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी (दि.१८) ग्रामस्थांनकडून टाकेद बंद ची हाक देण्यात आली.

सर्वतीर्थ टाकेद बु येथील व्यावसायिकांनी, ग्रामस्थांनी एकमताने आस्थापने व बाजारपेठ पूर्ण दिवस बंद ठेवण्यात आले होती. दुपारी न्यू इंग्लिश स्कूल व महर्षी वाल्मिकी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून मूक श्रद्धांजली रॅली काढली होती. या रॅलीत जवळपास दोन हजार विद्यार्थी, ग्रामस्थ, युवक, शिक्षक, कर्मचारी वृंद सहभागी झाले होते. त्यानंतर हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सर्व गावकऱ्यांनी, शालेय विद्याथ्यांनी गावातील मुख्य चौकात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माते की जय, जय जवान जय किसानघशेषणा देत विद्यार्थ्यांनी मुुक श्रद्धांजली मोर्चा काढला.
टाकेद बंद असल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. सायंकाळी सात वाजता गावातील तरुण, महिला व ग्रामस्थांनी मुख्य चौकात एकत्र येऊन गावाच्या पारावरती मेणबत्या पेटवून फलकाद्वारे शहीद जवानांना पसायदान म्हणून शोकसभेत आदरांजली अर्पण केली.