सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा मुकेश कापडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 05:52 PM2019-12-21T17:52:55+5:302019-12-21T17:54:01+5:30

नायगाव : सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Mukesh Kapadi re-elected as president of Sinnar Taluka Village Workers Police Patil Association | सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा मुकेश कापडी

सिन्नर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कापडी यांचा सत्कार करतांना जिल्हा अध्यक्ष चिंतामण मोरे, अरूण बोडके, शिवाजी पोमणार, रविंद्र खरात, अर्चणा भगत, विष्णू कापडी, मोहन सांगळे, भिकाजी गिते, संगिता काकड, तारा घुगे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देबैठकीत कापडी यांची फेर निवड करण्यात आली.

नायगाव : सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेर निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरु ण बोडके, संपत जाधव, सचिव अरु ण महाले, संघटक रविंद्र जाधव, निफाड तालुका अध्यक्ष अनिल गडाख, सेवानिवृत्त पोलीस पाटील वाल्मिक कडवे, माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड आदी प्रमुख उपस्थित होते.
तालुका अध्यक्षपदाची मुदत संपल्याने शुक्र वारी (दि.२०) झालेल्या तालुका पोलिस पाटलांच्या बैठकीत कापडी यांची एक वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्यध्यक्षपदी रवी सोणवने, सचिव म्हणून शुभाष बैरागी, महिला प्रतिनिधी म्हणून भाग्यश्री पाटोळे, सविता त्रिभुवन, मनिषा कोकाटे, ज्योती तांबे आदींची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका उपाध्यक्ष मोहन सांगळे, शिवाजी पोमणार, रविंद्र खरात, सागर मुठाळ, अर्चणा भगत, सुनंदा शेळके, मच्छिंद्र आव्हाड, मच्छिंद्र काळे, संगिता काकड, तारा घुगे, संदिप सानप, विष्णू कापडी, भिकाजी गिते आदी उपस्थित होते.

 

Web Title: Mukesh Kapadi re-elected as president of Sinnar Taluka Village Workers Police Patil Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.