मुकणे जलवाहिनी योजना रखडणार

By admin | Published: September 30, 2015 12:04 AM2015-09-30T00:04:46+5:302015-09-30T00:05:24+5:30

पालिकेचा निष्काळजीपणा : कंपनीच्या अल्टीमेटमचा अखेरचा दिवस

The Mukesh Water Station | मुकणे जलवाहिनी योजना रखडणार

मुकणे जलवाहिनी योजना रखडणार

Next

नाशिक : शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेच्या कामाबाबत महापालिकेने त्वरित निर्णय घ्यावा यासाठी या कामाची निविदा भरणाऱ्या ठेकेदार एल. अ‍ॅँड टी. कंपनीने महापालिकेला दिलेल्या अल्टीमेटमची मुदत बुधवारी संपत असून, या कालावधीत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने योजनेच्या अंमलबजावणीच्या आशा धुसर झाल्या आहेत.
केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत सदरची योजना राबविण्यात येणार आहे. मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची योजना आहे. सदरच्या योजनेच्या पूर्णत्वानंतर हे पाणी पाथर्डी, वडनेरगेट, इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा वाढविता येणार आहे. या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी केल्याने १४ मे रोजी योजनेच्या अंमलबजावणीस स्थगिती आली होती. त्यानंतर २० आॅगस्ट रोजी स्थगिती उठविण्यात आल्यानंतरही महापालिकेने निविदेबाबत अंतिमत: कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे गेल्या ८ सप्टेंबर रोजी पात्र निविदाधारक एल. अ‍ॅँड टी. कंपनीने आयुक्तांना पत्र देऊन ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा अन्यथा आणखी वैधता कालावधी वाढविता येणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Mukesh Water Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.