मुखेड-देशमाने रस्त्याचे डांबरीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:29+5:302021-05-28T04:11:29+5:30
मानोरी : नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या येवला तालुक्यातील मानोरी बु. ते मुखेड या दोन किलोमीटर अंतराचे, तर मानोरी बु. ...
मानोरी : नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या येवला तालुक्यातील मानोरी बु. ते मुखेड या दोन किलोमीटर अंतराचे, तर मानोरी बु. ते देशमाने शिव या एक किलोमीटर अंतराचे डांबरीकरणाचे काम दीड ते दोन महिन्यांपासून रखडले आहे. या दोन्ही रस्त्यांवर केवळ खडी पसरवून डांबर टाकलेले असून, सुमारे दोन महिन्यांपासून हा रस्ता खडीकरणाच्या अवस्थेत पडून असल्याने डांबरीकरणाचे दगड-गोटे मुखेड गावालगत दोन ते तीन ठिकाणी विस्कळीत झाले आहेत. या अर्धवट कामामुळे या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढू लागला आहे. रखडलेले खडीकरणाचे काम पुन्हा व्यवस्थित करून काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
देशमाने, मानोरी बु. ते मुखेड या पाच किलोमीटर अंतराची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होत चालली होती. मात्र, या खराब होत चाललेल्या रस्त्याच्या कामाला पुन्हा नव्याने मंजुरी मिळाल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, देशमाने ते मुखेड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील सुमारे तीन किलोमीटर अंतराचे खडीकरण करून केवळ डांबरीकरण करण्यात आले असून, महिनाभरापासून पुढील कामाला मुहूर्त लागत नसल्याने ठिकठिकाणी दगड-गोटे विस्कळीत होऊ लागले आहेत.
-------------------
किरकोळ अपघातामध्ये वाढ
दगड-गोटे विस्कळीत झालेल्या ठिकाणी वाहने सरकून छोटे-मोठे अपघात घडत असून, दोन चाकी वाहने घसरून पडल्याने वाहनांचे नुकसानदेखील होत असल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना या विस्कळीत झालेल्या दगड-गोट्यांचा अंदाज येत नसल्यानेदेखील वाहने दगड-गोट्यांवरून घसरून अपघात होत असल्याचे वाहन चालकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ देशमाने मुखेड रस्त्याचे रखडलेले डांबरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी पंचक्रोशीतील वाहन चालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
-----------------
फोटो : देशमाने-मुखेड रस्त्यावर मुखेड गावाजवळ विस्कळीत झालेले दगड-गोटे. (२६ मानोरी)
===Photopath===
260521\504726nsk_18_26052021_13.jpg
===Caption===
२६ मानोरी