मुखेड गटात चुरशीची लढत

By admin | Published: February 14, 2017 12:10 AM2017-02-14T00:10:30+5:302017-02-14T00:10:58+5:30

रस्सीखेच : बागायती पट्ट्यात महिला राज अवतरणार

In the Mukhed Group, a fight with a bout | मुखेड गटात चुरशीची लढत

मुखेड गटात चुरशीची लढत

Next

 दत्ता महाले/संतोष अहेर येवला
राजकीय, सामाजिकदृष्ट्या येवला तालुक्यातील मुखेड गटात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस यांच्यात वरकरणी चौरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील लढत रंगतदार ठरणार आहे. मुखेड गट, मुखेड गण आणि चिचोंडी गणात महिलांचे आरक्षण राहिल्याने मुखेडच्या बागायती पट्ट्यात महिला राज अवतरणार हे आरक्षणाने निश्चित केले आहे.
मुखेड गटात मविप्रचे संचालक व सहकार नेते अंबादास बनकर यांचा वरचष्मा राहिला आहे. माजी आमदार मारोतराव पवार यांचा नात्यागोत्याचा मोठा जत्था या भागात आहे. दरम्यान, बनकर राष्ट्रवादीत, तर पवार सेनेत आहे.
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मानणाराही मोठा वर्ग मुखेड परिसरात आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटवाटपात बनकर यांनी सामंजस्य दाखवल्याने मुखेडसह पाटोदा
गटात दमदार पाय रोवता आला. मात्र भुजबळ यांच्या नेतृत्वाविना निवडणुकीत उतरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न करीत मुखेड गटातून कमल भाऊसाहेब अहेर यांना उमेदवारी दिली आणि चुरस निर्माण केली.
या गटात राष्ट्रवादीच्या वतीने विद्यमान सदस्य बाळासाहेब गुंड यांना तत्कालीन आमदार छगन भुजबळ व स्थानिक नेत्याचे पाठबळ लाभले. व त्यांना संधी मिळाली होती. मात्र आता स्थानिक नेत्यांनी तालुक्यावर पुन्हा आपली पकड आणि आपले वर्चस्व कसे प्रस्थापित होईल या उद्देशाने व्यूहरचना केली आहे. त्यामुळे या गटात शिवसेना नेते संभाजीराजे पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांनी शिवसेनेचा उमेदवार देऊन राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात मातब्बर उमेदवारांना संधी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. या गटाचा इतिहास लक्षात घेऊन राष्ट्रवादीने विद्यमान सदस्य कृष्णराव गुंड यांच्या सौभाग्यवती कुसूम गुंड यांना या गटातून संधी दिली आहे, तर शिवसेनेने कमल अहेर यांना संधी देऊन राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. मुखेड ग्रामपंचायतीमध्ये जि. प. सदस्य कृष्णराव गुंड व भाऊसाहेब अहेर यांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन केली असून, येत्या निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
तसेच या गटातून भाजपाने देखील सुरेखा कदम यांना उमेदवारी दिली आहे, तर कॉँगे्रसने संगीता अहेर यांना या लढतीत उतरविले असून, ज्योती पानसरे व अस्मिता साताळकर हे दोन अपक्षदेखील या लढतीत पक्षीय उमेदवारांना अडचणीचे ठरण्याची चर्चा आहे.

Web Title: In the Mukhed Group, a fight with a bout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.