मुखेड-खडकीमाळ रस्त्याचे काम निकृष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:53 PM2020-02-22T22:53:10+5:302020-02-23T00:24:07+5:30
येवला तालुक्यातील मुखेड रस्त्यावरील मुखेड-खडकीमाळ (मानोरी बुद्रुक) या दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतराचे नव्याने खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर रस्त्याचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार मानोरी बुद्रुक व मुखेड येथील नागरिकांनी केली आहे. या कामाचा दर्जा न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आला आहे.
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड रस्त्यावरील मुखेड-खडकीमाळ (मानोरी बुद्रुक) या दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतराचे नव्याने खडीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सदर रस्त्याचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार मानोरी बुद्रुक व मुखेड येथील नागरिकांनी केली आहे. या कामाचा दर्जा न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आला आहे.
सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था, गटार करण्यात आलेली नाही, कामात वापरली जाणारी खडीसुद्धा निकृष्ट दर्जाची असून, ही खडी बदलून चांगल्या प्रकारची खडी टाकावी आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे. येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गाला मिळणारा हा मुखेड ते मुखेड फाटा पाच किलोमीटर अंतराचा मुख्य रस्ता असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. मागील पाच ते सात वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था होत चालल्याने या रस्त्याची होणारी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. निवेदनावर सरपंच नंदाराम शेळके, पोलीसपाटील आप्पासाहेब शेळके, शिवसेना नेते छगन आहेर, अनंता आहेर, पोपट शेळके, दत्तू शेळके, श्रावण शेळके, विठ्ठल शेळके, ज्ञानेश्वर शेळके, बाळासाहेब शेळके, संतोष शेळके, भाऊसाहेब शेळके आदींच्या सह्या आहेत.
सुमारे १० वर्षांनी या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला मुहूर्त लागला आहे. त्यात हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुखेड-खडकीमाळ रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सोमवारी (दि.२४) रस्त्याच्या निकृष्ट असलेल्या कामाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच पंचायत समिती उपअभियंता कार्यालयातदेखील देणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.