मुखेड-महालखेडा रस्त्याची बाभळींच्या साम्राज्यात ‘वाट ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 08:22 PM2020-09-10T20:22:35+5:302020-09-11T00:42:59+5:30
मुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे. एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याचे दुरु स्ती काम चालू आहे. पैकी चार किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आता हा रस्ता खड्यात हरवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे.
एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याचे दुरु स्ती काम चालू आहे. पैकी चार किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आता हा रस्ता खड्यात हरवला आहे. शेवटच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे गेल्या चार वर्षापासून दुरु स्ती काम चालू आहे. सदर रस्ता दुरु स्तीसाठी वापरण्यात आलेली खडी न दाबता तशीच अस्ताव्यस्त पसरलेली आहे.
एखाद्या ठेकेदार वर्षानुवर्ष रस्ता दुरु स्त करीत नसेल तर संबंधित शासकीय अधिकाच्या नजरेतून ही बाब कशी सुटली ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत या रस्त्याने चार चाकी वाहन तर जाऊ द्या साधे दुचाकी सारखे वाहनही जाऊ शकतं नाही, अशी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आता रब्बी हंगामातील सोयाबीन, मका आदी पिके पूर्णत्वाकडे जात असून महिन्याभरात या पिकांच्या सोंगणीस प्रारंभ होईल याशिवाय पिकांच्या मशागतीसाठी रोज प्रवास करताना या रस्त्याने कसे जावे या यक्ष प्रश्नाने शेतकरीवर्ग हादरून गेला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून संबंधीतांवर कारवाई करून रस्त्याची दुरु स्ती करून दुतर्फा वाढलेल्या बाबळीचे साम्राज्य हटवावे, अशी मागणी प्रतीक आहेर, दिलीप आहेर, गोरख राऊतराये, दत्ता आहेर, सचिन आहेर आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे.