मुखेडच्या भवानी देवीचा यात्रोत्सव दुसऱ्यांदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:55 PM2021-04-18T18:55:04+5:302021-04-18T18:55:38+5:30
मानोरी : दरवर्षी चैत्र महिन्यात भरविण्यात येणारी येवला तालुक्यातील मुखेड येथील भवानी देवीचा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.
मानोरी : दरवर्षी चैत्र महिन्यात भरविण्यात येणारी येवला तालुक्यातील मुखेड येथील भवानी देवीचा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.
चैत्र महिन्याच्या षष्ठीपासून दरवर्षी यात्रोत्सवाला सुरुवात होते. षष्ठीपासून तीन दिवस ही यात्रा भरविण्यात येत असते. पहिल्या दिवशी भवानी मातेची खणा-नारळाने ओटी भरून संध्याकाळी गावातून मिरवणूक काढली जाते. यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे तमाशा व कुस्त्यांची स्पर्धा. यात्रेच्या पहिल्या दिवशी कलाकार मंडळींचा तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. तसेच पुढील दोन दिवस कुस्त्यांची स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या वर्षीचा देखील यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टचे कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून घेण्यात आला आहे.